शिंदे शिवसेनेच्या नरेंद्र मस्के यांना वैभव नाईक यांचा सडेतोड उत्तर
नरेश म्हस्के आधी कोणाकडे तिकिटासाठी जात होते, म्हस्केंना जिल्हाप्रमुख, नगरसेवक, महापौर कोणी केलं? मुळात एकनाथ शिंदे जेव्हा गेले तेव्हा उद्धव ठाकरे फोन करू शकत होते. मात्र, त्यांनी त्यावेळी फोन केला नाही. एका झटक्यात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, मग ते आता का फोन करतील? संख्याबळानुसार कोण सभागृहात जाईल, हे महाविकास आघाडीतील नेते ठरवतील. राज्यामध्ये शेतकऱ्यांचे जनतेचे विविध प्रश्न असताना त्या प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्यासाठी हे असे मुद्दे सत्ताधाऱ्यांकडून चर्चेत आणले जातात.
.. वैभव नाईक माजी आमदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट