सिंधुदुर्ग दि.१६: गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी सावंतवाडीमध्ये १९ मार्च रोजी भव्य ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. सकल हिंदू समाज हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या यात्रेमध्ये शहरातील विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.ही शोभायात्रा चैत्र शुद्ध प्रतिपदा, १९ मार्च रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता राजवाडा येथून सुरू होईल. यात्रेचा मार्ग नारायण मंदिर, गांधी चौक, जयप्रकाश चौक, शिवरामराजे पुतळा मार्गे भोसले उद्यान येथे संपणार आहे. हिंदू धर्माचे नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत आणि सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक श्री. शैलेश गुरुदास पै आणि सह-संयोजिका श्रीम. सौ. गायत्री गुरुदास देवस्थळी यांनी आज रविवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.या पत्रकार परिषदेत खजिनदार आनंद साधले, विकास रांगणेकर, विशाखा रांगणेकर, कस्तुरी देवस्थळी, दिनेश गावडे आदी उपस्थित होते. या नववर्ष स्वागत यात्रेत विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात येत असून, विविध संस्था आणि उत्सव समित्या यात सक्रिय सहभाग घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले. या यात्रेत आरंभ सखी, बजरंग दल, दुर्गावाहिनी, एकमुखी दत्तमंदिर ट्रस्ट, घे भरारी, गोरक्षक, हरेकृष्ण संस्कार केंद्र, हिंदू वैश्य वाणी संघटना, पाटीदार समाज, पुर्व सैनिक सेवा परिषद, रासाई कला क्रीडा मंडळ, रिक्षा संघटना, सालईवाडा मित्रमंडळ, समता महिला मंडळ, सनातन संस्था, शिवकन्यका, शिवप्रतिष्ठान हिन्दुस्तान, श्री. रामानंद संप्रदाय नरेंद्र महाराज, सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सुवर्णकार संघ, वैश्यवाडा मित्रमंडळ, वेदपाठशाळा सावंतवाडी, महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, विद्याभारती शिशुवाटिका, विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाज यांचा समावेश आहे. हिंदू नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्यासाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे संयोजक शैलेश पै व सह संयोजक सौ गायत्री देवस्थळी यांनी आवाहन केले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


