📍 सावंतवाडी दि.१७: “राजकीय हेतूने प्रेरित होऊन वकिलांचे चारित्र्यहनन करू नका, अन्यथा गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी आसिम सरोदे यांच्या आरोपांचा सावंतवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत समाचार घेतला.
यावेळी वकील संघटनेचे पदाधिकारी ऍड शामराव सावंत, अनिल केसरकर, गोविंद बांदेकर अमोल कविटकर स्वप्नील कोलगावकर सुमित सुकी सिद्धी परब संकेत नेवगी अंकुश ठाकूर राहुल मडगावकर प्रतीक्षा भिसे सुशील राजगे आदी उपस्थित होते.
✅ प्रमुख मुद्दे: 🔹 सरोदे यांचे आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित. 🔹 संग्राम देसाई यांच्या माध्यमातून वकिलांसाठी खंडपीठ, एआय रिसर्च सेंटर आणि संरक्षण कायद्याचे मोठे काम. 🔹 निवडणूक प्रक्रिया निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली पूर्णपणे पारदर्शक. 🔹
‘चळवळ बदनाम होत आहे’
‘निर्भय बनो’ चळवळीच्या नावाखाली चुकीच्या प्रवृत्तींना थारा दिला जात असल्याचा आरोप.
“आम्ही ‘निर्भय बनो’च्या अनेक सभा घेतल्या आहेत, मात्र गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींसोबत काम करण्यात सरोदे यांना काय रस आहे? अशाने चळवळ बदनाम होत आहे,” अशी टीका ॲड. संदीप निंबाळकर यांनी केली. तर ॲड. बी. बी. रणशूर यांनी स्पष्ट केले की, सावंतवाडी वकील संघटनेकडे सभेसाठी कोणताही अधिकृत अर्ज आला नव्हता; संघटना सर्व सदस्यांच्या संमतीनेच निर्णय घेते.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


