सावंतवाडी दि.२६. सावंतवाडी येथील पोलीस परेड मैदानावर 77 वा प्रजासत्ताक दिन प्रांताधिकारी समीर घारे यांच्या हस्ते ध्वजवंदनाने साजरा झाला यावेळी कमांडिंग ऑफिसर म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी परेडचे नेतृत्व केले. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील तसेच माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले स्वातंत्र सैनिक अण्णा केसरकर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग दर्शवला. यावेळी शहरातील कळसुलकर इंग्लिश स्कूल, श्री पंचम खेमराज महाविद्यालय, राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज उर्दू इंग्लिश स्कूल तसेच एनसीसी पथकाने संचलनात सहभाग घेतला या संचलनात सावंतवाडी पोलीस पथकही सहभागी झाले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले यावेळी नायब तहसीलदार, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.



