सावंतवाडी दि.२१: तालुक्यातील निरवडे गावात भरवस्तीत सुरू असलेल्या डुक्कर व्यवसायामुळे स्थानिक ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या ६ महिन्यांपासून तक्रार करूनही आरोग्य विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप करत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
📍 भरवस्तीत प्रकल्प असल्याने विष्ठेचा प्रचंड दुर्गंध, ग्रामस्थांचे जगणे असह्य.
📍 आरोग्य विभागाकडे ६ महिने पाठपुरावा करूनही कारवाई शून्य.
📍 “व्यवसाय जरूर करा, पण इतरांना त्रास नको” – संजू परब.
📍 पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे तक्रार करणार; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा.
यावेळी राजू धुमाळ, विलास नाईक, प्रतीक्षा पारकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या प्रकरणावर प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 निरवडे ग्रामस्थांचा टाहो! डुक्कर व्यवसायाच्या दुर्गंधीने गाव त्रस्त!
सावंतवाडीतील निरवडे गावात वस्तीच्या मध्यभागी चालणाऱ्या डुक्कर व्यवसायामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार तक्रार करूनही आरोग्य विभाग ढिम्म असल्याने ग्रामस्थांनी संजू परब यांच्याकडे धाव घेतली.
💥 संजू परब यांचा इशारा:
“जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. हा विषय तातडीने नितेश राणे यांच्या कानावर घालणार!”
🐷 निरवडेत डुक्कर व्यवसायाचा ग्रामस्थांना त्रास!
गेल्या ६ महिन्यांपासून आरोग्य विभागाचे दुर्लक्ष. संजू परब यांनी घेतली दखल; आता थेट पालकमंत्र्यांकडे तक्रार जाणार!
“अधिकाऱ्यांनी वेळीच सुधारले नाही, तर पालकमंत्र्यांच्या रोषाला बळी पडावे लागेल!” – संजू परब
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


