📍 सावंतवाडी दि.२१: कॅप्टन अशोक खरात यांच्या अटकेनंतर त्यांचे काही राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे आपली बाजू मांडली असून विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
🔍 स्पष्टीकरणातील महत्त्वाचे मुद्दे:
📸 फोटोंमागचे सत्य: “व्हायरल झालेला एक फोटो ईशानेश्वर मंदिराच्या रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यावेळचा आहे. तर दुसरा फोटो खरात यांच्या मुलीच्या लग्नातील असून, ओळखीच्या नात्याने मी तिथे शुभेच्छा द्यायला गेलो होतो.”
🤝 ओळखीचे कारण: खरात यांची ओळख सिन्नर येथील ईशानेश्वर मंदिरामुळे आणि त्यांच्या ‘खगोलशास्त्र’ (Astronomy) विषयातील अभ्यासामुळे होती, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
💥 संजय राऊतांना टोला: “खरात माझे डिपार्टमेंट चालवत होते हा दावा पूर्णपणे खोटा आहे. ते एकदाही माझ्या ऑफिसमध्ये आलेले नाहीत,” असे सांगत केसरकर यांनी राऊतांचे आरोप फेटाळून लावले.
⚖️ अटकेचा निषेध: खरात यांच्यावरील आरोप घृणास्पद असून मी त्याचा निषेध करतो, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईलच.
🚨 आवाहन: राजकीय वैमनस्यातून जुने फोटो पसरवून जनतेत गैरसमज निर्माण करू नयेत, अशी विनंतीही केसरकर यांनी शेवटी केली आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


