सावंतवाडी दि.०८: येथील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मच्छी मार्केटमध्ये सांडपाण्याचा निचरा करणाऱ्या गटारांवरील फरश्या (जाळ्या) अनेक ठिकाणी तुटलेल्या आणि उघड्या स्थितीत आहेत. यामुळे मंगळवारी मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या अनेक ग्राहकांचा पाय घसरून पडल्याच्या घटना घडल्या असून, यामध्ये वृद्ध, महिला आणि लहान मुलांना किरकोळ दुखापत झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सावंतवाडीचे मच्छी मार्केट सर्व सोयींयुक्त म्हणून ओळखले जाते, त्यामुळे संपूर्ण तालुक्यातून येथे ग्राहकांची मोठी गर्दी असते. मार्केटमधील स्वच्छतेसाठी सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे बांधून त्यावर प्लास्टिकच्या मजबूत जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांत या फरश्या कमकुवत होऊन ठिकठिकाणी तुटल्या आहेत, तर काही ठिकाणी त्या पूर्णपणे गायब आहेत.
मासे खरेदी करताना जमिनीवर सांडपाणी साचलेले असते, ज्यामुळे आधीच निसरड्या झालेल्या जागेत या उघड्या गटारांमुळे अपघाताची भीती वाढली आहे. मंगळवारी झालेल्या अपघातांमुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी हे मार्केट आता धोकादायक ठरू लागले आहे.
नगरपालिका प्रशासनाला वारंवार कळवूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत. जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या ठिकाणची पाहणी करून उघड्या गटारांवर नवीन मजबूत फरश्या बसवाव्यात आणि सांडपाण्याची व्यवस्था बंदिस्त करावी, अशी आग्रही मागणी ग्राहक आणि मच्छी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


