🛑 निसर्गाचा विनाश करून विकास? शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या मार्गामुळे ‘नागराज’ संकटात! 🐍🌳

सावंतवाडी दि.०९: शक्तिपीठ महामार्गाचे पुनर्रेखांकन आता सिंधुदुर्गातील अतिसंवेदनशील जैवविविधतेचा बळी घेणार? केगद-कुंभवडे ते बांदा या पट्ट्यातून जाणाऱ्या या महामार्गामुळे निसर्गप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

📍 काय आहे नेमका प्रकार?
महामार्गाचा नवा मार्ग तळकट, झोळंबे, डेगवे आणि बांदा या घनदाट जंगल क्षेत्रातून जाणार आहे. या प्रक्रियेत लाखो महाकाय वृक्षांची बेसुमार कत्तल होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

🐍 किंग कोब्राचे दर्शन – निसर्गाचा इशारा?

कालच सरमळे गावात दुर्मिळ ‘किंग कोब्रा’ (नागराज) दिसला! काही दिवसांपूर्वी तळकट येथेही नागराजाचे दर्शन झाले होते.वाघ, बिबट्या, हत्ती आणि गव्यांचा हा हक्काचा अधिवास आता धोक्यात आला आहे.

🤔 जनतेचा सवाल:
ज्या भागात किंग कोब्रासारखी दुर्मिळ प्रजाती आढळते, तिथे वृक्षतोड करणे कितपत योग्य? निसर्ग आपल्याला ‘नागराजा’च्या रूपाने ईश्वरी संकेत देत आहे का? भोंदूगिरीच्या मागे लागणाऱ्या सत्ताधाऱ्यांना हे संकेत कळतील का? असा रोखठोक सवाल डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी उपस्थित केला आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here