सोनुर्लीत वनविभागाचा मोठा दणका; लाखो रुपयांचा अवैध खैरसाठा जप्त

सावंतवाडी दि.११: तालुक्यातील सोनुर्ली येथे वनविभागाने धाडसी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर खैरसाठा जप्त केला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने रात्री उशिरा ही कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात खैर लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

रात्री उशिरापर्यंत सुरू होती कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, सोनुर्ली परिसरात मोठ्या प्रमाणात खैर लाकडाची अवैध साठवणूक केली जात असल्याची खबर वनविभागाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी आजगाव वनक्षेत्र विभागाचे वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप आणि त्यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला. रात्री उशिरा सुरू झालेली ही कारवाई पहाटेपर्यंत सुरू होती. या मोहिमेत वनविभागाच्या टीमने लाखो रुपये किमतीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

किंमत मोजण्याचे काम सुरू
जप्त करण्यात आलेल्या खैरसाठ्याची बाजारभावाप्रमाणे नेमकी किंमत किती आहे, याची मोजणी वनविभागाकडून सध्या सुरू आहे. हा साठा मोठा असल्याने याची किंमत लाखांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदरची यशस्वी कारवाई सावंतवाडी उपवनसंरक्षक मिलेश शर्मा आणि सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण केली.

या धडक कारवाईमुळे सिंधुदुर्गातील लाकूड तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर वनविभागाचा वचक निर्माण झाला आहे. या प्रकरणी अधिक तपास वनविभागाकडून केला जात आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here