
सावंतवाडी दि.१४: तालुक्यातील सातार्डा-तरचावाडा येथील रहिवासी आणि माजी सैनिक चंद्रकांत पवार यांच्या पत्नी, तसेच ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार यांच्या मातोश्री सौ. चंद्रावती चंद्रकांत पवार (७९) यांचे मंगळवारी पहाटे ६.३५ वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सातार्डा परिसरासह संपूर्ण सावंतवाडी तालुक्यात शोककळा पसरली आहे.
सौ. चंद्रावती पवार या अत्यंत प्रेमळ, साध्या आणि कुटुंबवत्सल स्वभावाच्या होत्या. आयुष्यभर त्यांनी कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणून आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली. घरातील प्रत्येकाला प्रेमाने जोडून ठेवणाऱ्या त्या एक भक्कम दुवा होत्या. त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे परिसरातही त्या सर्वांच्या आदरास पात्र होत्या.
त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, एक मायेची सावली हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती, मुले, मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
सौ. पवार यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी शोकसंवेदना व्यक्त करत पवार कुटुंबाला या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी धीर दिला आहे.
चौकट
बुधवारी होणार अंत्यसंस्कार
सौ चंद्रावती हिच्या पार्थिवावर सातार्डा तरचावाडा स्मशानभूमीत बुधवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


