सावंतवाडी,दि.१४: निरवडे येथील झरबाजार परिसरात सोमवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारींवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या गटातील चेतन गोविंद गावडे (वय ३२, रा. निरवडे देऊळवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण मोहन गावडे, श्रीमती लक्ष्मण गावडे, शिवाजी सुरेश गावडे, चंद्रा धारगळकर आणि सुनील सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मित्राला मारण्याची धमकी दिल्याबाबत शिवाजी गावडे याला विचारणा केली असता चेतन गावडे, निलेश शिरोडकर, सिताराम गावडे आणि लाडू गावडे यांना लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या झटापटीत शिवाजी सुरेश गावडे यांनी सिताराम लाडू गावडे यांच्या हाताला चावा घेतल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.दुसरीकडे, दुसऱ्या गटातील श्रीमती लक्ष्मण गावडे (रा. निरवडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे दीर शिवाजी सुरेश गावडे यांना मारहाण होत असताना त्या सोडवण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना देखील लाकडी दांड्याने व हाताने मारहाण करण्यात आली. या तक्रारीवरून लाडू गावडे, सिताराम गावडे, चेतन गावडे, गुरुनाथ गावडे, उमाकांत गावडे आणि निलेश शिरोडकर या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार हनुमंत धोत्रे हे करीत आहेत.घटनेनंतर रात्री उशिरा दोन्ही गटांतील व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


