अवैध वाळू माफियांवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; १५ वाहने जप्त

सिंधुदुर्गनगरी दि. १८:  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून फोफावलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाने दणका दिला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या थेट नेतृत्वाखाली महसूल विभागाने जिल्ह्याभरात एकाच वेळी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत १५ वाहने जप्त केली आहेत. या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

प्रशासनाची गुपित मोहीम यशस्वी

जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक निर्देशानुसार, जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या तहसीलदारांनी संयुक्त पथके तयार करून अत्यंत गोपनीयरीत्या ही मोहीम आखली होती. सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, वैभववाडीचे सूर्यकांत पाटील, कणकवलीचे दीक्षात देशपांडे, मालवणचे गणेश लव्हे, वेंगुर्ल्याचे ओंकार ओतारी आणि कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून ही कारवाई यशस्वी केली.

कुठे किती कारवाई?

प्रशासनाने विविध भागांत सापळा रचून एकूण १५ वाहने ताब्यात घेतली आहेत:वैभववाडी: आचरा-कणकवली मार्ग (२ वाहने),वेंगुर्ला: देवली-परुळे मार्ग (३ वाहने),कणकवली: कुंभारमाठ (३ वाहने),सावंतवाडी: तोंडवली (३ वाहने),कुडाळ: कुडाळ परिसर (४ वाहने) जप्त केलेली सर्व वाहने संबंधित तहसील कार्यालयांच्या आवारात जमा करण्यात आली असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पहाटे ३ पर्यंत चालली मोहीम

या मोहिमेचे गांभीर्य लक्षात घेता, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः रात्री उशिरा झाराप परिसरात भेट देऊन कारवाईचा आढावा घेतला. रात्री उशिरा सुरू झालेली ही मोहीम पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होती. प्रशासनाच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे अनेक वाळू व्यावसायिकांनी भीतीने वाहनातील वाळू रस्त्यावरच ओतून पळ काढला, तर काहींच्या बोटी खाडी पात्रातच अडकून पडल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आणि सर्व तहसीलदारांच्या समन्वयाने पार पडलेली ही कारवाई म्हणजे अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेले युद्ध असल्याचे बोलले जात आहे. अशा प्रकारच्या गुप्त आणि संयुक्त कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहतील, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here