स्वतःच्याच मातीत कोकणी माणूस झाला परका! कन्फर्म तिकीट असूनही रत्नागिरीत तरुणाला गाडीबाहेर काढले!
रत्नागिरी दि.१८: काल रत्नागिरी रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला. एका मराठी तरुणाकडे हक्काचे ‘कन्फर्म तिकीट’ होते, पण गाडीत घुसायला जागाच नव्हती! का? कारण गोव्यातून बिहारला जाणारी ट्रेन उत्तर भारतीयांच्या गर्दीने आधीच खच्च भरून आली होती.
🔥 संतापाची लाट: आमची जमीन, आमची रेल्वे, मग आम्हीच बाहेर का?
ज्या कोकण रेल्वेसाठी आपल्या बापजाद्यांनी जमिनी दिल्या, त्याच रेल्वेवर आज कोकणी माणसाला ‘भिकाऱ्यासारखी’ वागणूक मिळत आहे. परराज्यातून येणाऱ्या गाड्यांच्या तुकड्यांवर आम्ही किती दिवस जगायचे? हा प्रश्न आता प्रत्येक कोकणवासी विचारत आहे.
✅ उपाय एकच: सावंतवाडी रेल्वे टर्मिनस!
रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी स्पष्ट केल्यानुसार, जोपर्यंत गाड्या मडगाव किंवा इतर राज्यांतून सुटतील, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही.
📍 सावंतवाडी टर्मिनस पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास 1️⃣ गाड्या थेट तिथून सुटतील आणि कोकणी माणसाला पहिली जागा मिळेल.2️⃣ गाड्यांच्या देखभालीसाठी त्या गोव्याला पाठवण्याची गरज उरणार नाही.3️⃣ परप्रांतीय गर्दीचा त्रास कमी होऊन महाराष्ट्रासाठी स्वतंत्र गाड्या धावतील.
📢 आता वेळ आली आहे हक्क हिसकावून घेण्याची !
रेल्वे प्रशासनाच्या या मनमानी कारभाराला चपराक देण्यासाठी आणि झोपलेल्या व्यवस्थेला जागे करण्यासाठी सज्ज व्हा!
🗓️ चला दादरला ! विषय: महाराष्ट्र रेल्वे परिषद (आरपारची लढाई), तारीख: २६ एप्रिल २०२६
वेळ: सकाळी १० वाजता,ठिकाण: दादर, मुंबई.
कोकणी माणसाच्या स्वाभिमानासाठी हा मेसेज वाऱ्यासारखा पसरवा! 🚩
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563


