💰 १० लाखांचा निधी मंजूर; संजू परब यांच्या हस्ते दिमाखात पार पडले भूमिपूजन!
सावंतवाडी दि.१९: तालुक्यातील पारपोली गावचे ग्रामदैवत श्री पावणाई रवळनाथ मंदिर परिसराचे रूप आता पालटणार आहे. शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून या सुशोभीकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आज या विकासकामाचे अधिकृत भूमिपूजन जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उत्साहात करण्यात आले.
“धार्मिक स्थळांचा विकास आणि जतन करणे ही काळाची गरज आहे. ग्रामस्थांच्या सोयीसुविधांसाठी आणि गावच्या सर्वांगीण विकासासाठी शिंदे शिवसेना नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभी राहील.”— संजू परब (जिल्हाप्रमुख)
यावेळी पारपोली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिलेल्या या निधीबद्दल ग्रामस्थांनी आमदार केसरकर यांचे आभार मानले असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563


