दोडामार्ग-बांदा रस्ता रक्ताने माखला; एसटी बसच्या धडकेत कुडासे येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

दोडामार्ग दि.१९: अक्षय तृतीयेच्या सणासुदीच्या दिवशीच दोडामार्ग तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पणजीहून धाराशिवकडे जाणाऱ्या एसटी बसने सासोली-हेदूस येथे दिलेल्या धडकेत कुडासे-वानोशी येथील दिलीप हळणकर (वय ५८) यांचा जागीच मृत्यू झाला.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप हळणकर हे आपल्या दुचाकीने इब्रामपूरहून बांदा-दोडामार्ग मुख्य रस्त्यावर येत होते. त्याच वेळी पणजीहून दोडामार्गमार्गे धाराशिवकडे जाणारी बस समोरून आली. बस चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी बस रस्त्याच्या कडेला नेली. हा प्रयत्न इतका भीषण होता की, रस्त्याशेजारील एका स्टॉलचे पत्रेही बसच्या धडकेने उडाले. मात्र, चालकाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही दुचाकी आणि बसची समोरासमोर जोरदार धडक झाली.

कुडासे गावावर शोककळा
या भीषण अपघातात दिलीप हळणकर यांचा जागीच अंत झाला. ते एका खासगी कंपनीत कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशीच घरातील कर्त्या पुरुषाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुडासे गावावर दुःखा डोंगर कोसळला आहे.

अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here