बेळगाव दि.२०:अंमली पदार्थ विक्री विरोधात बेळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे २ लाख ६० हजार रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. या प्रकरणी सावंतवाडी येथील एका तरुणासह दोघांना अटक करण्यात आली असून, सीसीबी (शहर गुन्हे शाखा) पोलिसांनी ही कारवाई केली.अखेरीस ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचा संशय तंतोतंत खरा ठरला,गोवा व कर्नाटक राज्यातील अंमली पदार्थांच्या अवैध धंद्याचे सिंधुदुर्ग कनेक्शन वेळोवेळी उघड होत आहे.
सावंतवाडी कनेक्शन आणि कारवाईचा तपशील: अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे नागेश मधुकर भगत (वय ३५, मूळ रा. सावंतवाडी, सध्या रा. सुळगा) आणि राहुल ज्योतिबा जाधव (वय ३३, रा. कंग्राळी केएच, सध्या रा. सुळगा) अशी आहेत. सुळगा गावातील देशपांडे गल्ली येथे हे दोघे अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
श्वान पथकाची कामगिरी: पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक व उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी (१८ एप्रिल) या ठिकाणी छापा टाकला. यावेळी श्वान पथकातील ‘अधिती’ या श्वानाने घरातील उशीत लपवून ठेवलेले अमली पदार्थ शोधून काढले. पोलिसांनी १२.९२ ग्रॅम वजनाच्या एकूण ११९ हेरॉईनच्या पुड्या आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.
मुंबईतून येत होता माल: प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे संशयित मुंबईतील कोळीवाडा परिसरातील ‘संतोष’ नावाच्या व्यक्तीकडून हेरॉईन आणून बेळगाव परिसरात विक्री करत होते. सध्या तो तिसरा संशयित पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563


