परीक्षित मांजरेकर यांची सावंतवाडी विधानसभा ‘शिवसेना BLA प्रमुख’ पदी नियुक्ती

सावंतवाडी दि.२०: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना जिल्हा सचिव श्री. परीक्षित मांजरेकर यांची सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला विधानसभा ‘शिवसेना बिएलए (Booth Level Agent) प्रमुख’ म्हणून महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार करण्यात आली आहे.

संघटनात्मक कौशल्याची पावती
परीक्षित मांजरेकर यांनी आजवर जिल्हा सचिव म्हणून काम करताना तळागाळातील कार्यकर्त्यांशी दांडगा संपर्क ठेवला आहे. त्यांच्या याच संघटन कौशल्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर विधानसभा स्तरावरील बूथ यंत्रणा सक्षम करण्याची मोठी धुरा सोपवली आहे. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यातील बुथ प्रमुखांचे जाळे विणणे आणि निवडणूक प्रक्रियेत बुथ स्तरावर पक्षाची पकड मजबूत करणे, ही त्यांची मुख्य जबाबदारी असणार आहे.

जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडून अभिनंदन
मांजरेकर यांच्या नियुक्तीची घोषणा होताच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना मांजरेकर म्हणाले की, “पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवत आगामी काळात महायुती आणि शिवसेनेची ताकद प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”

या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांकडून परीक्षित मांजरेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here