सावंतवाडी दि.२१: माजगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत महायुतीच्या अधिकृत सरपंचपदाच्या उमेदवार श्रीमती रंजना कानसे यांच्या प्रचार मोहिमेचा आज मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
श्रद्धेच्या स्थानापासून सुरुवात करत, ग्रामदैवत श्री देव महादेव आणि श्री देवी सातेरी मंदिरात श्रीफळ ठेवून विजयासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी गावाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करण्यात आला.
✨ उपस्थित मान्यवर शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब,जि प सदस्य विक्रांत सावंत, माजी जि प अध्यक्ष रेश्मा सावंत, भाजपचे पदाधिकारी मधुकर देसाई, महेश धुरी, रिची डिमेलो, अशोक दळवी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देवदर्शनानंतर ढोल-ताशांच्या गजरात प्रचार रॅलीला सुरुवात झाली. माजगावच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे!
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563


