📚 ‘यशवंत शिष्यवृत्ती’ – विद्यार्थ्यांच्या भविष्याची भक्कम पायाभरणी..अॅड अनिल निरवडेकर.

सावंतवाडी दि.३०: येथे ‘यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा २०२४-२५’ चा भव्य बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी शिक्षण क्षेत्रातील अशा उपक्रमांना “भविष्याची गुंतवणूक” असे संबोधत संदीप गावडे यांच्या कार्याचे कौतुक केले.
💬 “शिक्षणाचा आदर करणारा व्यक्तीच समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
🎓 दिवंगत यशवंत गावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या परीक्षेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागावी, हा मुख्य उद्देश असल्याचे संदीप गावडे यांनी सांगितले.
🙏 कार्यक्रमादरम्यान यशवंत गावडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
🏆 परीक्षेत अव्वल ठरलेल्या १० विद्यार्थ्यांना सायकली देऊन गौरविण्यात आले, तर इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके व प्रशस्तीपत्रे देण्यात आली.
📢 यावेळी १०वी-१२वी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याची मागणीही पुढे आली, ज्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.यावेळी व्यासपीठावर आयोजक संदीप गावडे, एकनाथ गावडे, सुनिता गावडे, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, नितीन मुळीक, शोभाताई गावडे, मायकल डिसोजा, नितीन राऊळ, गटशिक्षणाधिकारी शिंदे, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म. ल. देसाई, सागर ढोके, अनिकेत आसोलकर, गुलाबराव गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कै. यशवंत गावडे यांच्या स्मृतीला वंदन
अमेरिकेमध्ये आयटी क्षेत्रात कार्यरत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन पावलेले यशवंत गावडे यांच्या स्मरणार्थ या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यशवंत हे दशाक्रोशीतील पहिले आयटी इंजिनिअर होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना संपूर्ण सभागृकाने दोन मिनिटे उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

👏 शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या संदीप गावडे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here