सावंतवाडी,दि.०८: मळगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅक ओलांडताना झालेल्या भीषण अपघातात निरवडे-भंडारवाडी येथील एका ६२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. ललिता मिलिंद झाटे असे या महिलेचे नाव असून ही घटना आज सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास मळगाव रेल्वे फाटकापासून २०० मीटर अंतरावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ललिता झाटे या आज सकाळी मळगाव येथे बाजार करण्यासाठी आल्या होत्या. बाजार करून आपल्या घरी परतत असताना, रेल्वे ट्रॅक ओलांडताना त्यांना मांडवी एक्सप्रेसची जोरदार धडक लागली. ही धडक इतकी भीषण होती की त्या रेल्वे ट्रॅकवर कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर सावंतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563


