
सावंतवाडी (वा.) यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून ७ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कमिन्स इंडियाच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ४३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कमिन्स ही देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी कंपनी असून डिझेल व गॅस इंजिन, जनरेटर, पॉवर सिस्टिम तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक उपकरणांच्या निर्मितीत कार्यरत आहे. देश-विदेशातील विविध उद्योगांमध्ये कंपनीची उत्पादने वापरली जातात._
_या कॅम्पस ड्राइव्हमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे हा पूल कॅम्पस इंटरव्ह्यू असल्याने भोसले टेक्नॉलॉजी सोबतच शासकीय तंत्रनिकेतन, मालवण; शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी; एमआयटीएम, ओरोस; राजेंद्र माने पॉलिटेक्निक, देवरुख या संस्थांचे विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी झाले होते._
_विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची दखल घेत कंपनीकडून विविध तांत्रिक फेऱ्यांनंतर अंतिम निवड प्रक्रिया पार पडली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, टीपीओ हेड मिलिंद देसाई यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


