
सिंधुदुर्ग.दि.१५: इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा थरार आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून प्ले-ऑफचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. १२ मे पर्यंत हंगामातील ५६ सामने पार पडले असून आता केवळ १४ लीग सामने शिल्लक आहेत. या उर्वरित टप्प्यात गुजरात टायटन्सने दिमाखात आगेकूच केली असली तरी, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांसारख्या मोठ्या संघांचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.
गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवत १६ गुणांची कमाई केली आहे. या विजयासह गुजरातची प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी ९९.६ टक्के झाली असून त्यांचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. इतकेच नव्हे तर, टॉप-२ मध्ये राहण्याची त्यांची शक्यता ८४.५ टक्के इतकी प्रबळ आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) ८८.१ टक्के संधीसह दुसऱ्या स्थानावर असून, त्यांना टॉप-२ मध्ये ‘फिनिश’ करण्याची ५९ टक्के संधी आहे.
सनरायझर्स हैदराबादला गुजरातकडून मिळालेल्या पराभवामुळे मोठा फटका बसला आहे. त्यांची प्ले-ऑफची संधी ७६.८ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. पंजाब किंग्स ६४.५ टक्के आणि चेन्नई सुपर किंग्स ५३.९ टक्के संधीसह अद्याप शर्यतीत कायम आहेत. राजस्थान रॉयल्सची संधी ५३.८ टक्के असून, कोलकाता नाईट रायडर्स १२.८ टक्क्यांसह अंधूक आशा बाळगून आहे. दिल्ली कॅपिटल्सचे अस्तित्व मात्र धोक्यात आले असून त्यांची संधी केवळ १ टक्क्यावर उरली आहे.
या हंगामात सर्वात मोठा धक्का मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या चाहत्यांना बसला आहे. मुंबईने ११ पैकी केवळ ३ सामने जिंकल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान अधिकृतपणे संपले आहे. तर लखनऊने ११ पैकी ८ सामने गमावल्याने ते देखील टॉप-४ च्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. विशेष म्हणजे, वर्ल्ड कप गाजवणाऱ्या जसप्रीत बुमराहला या हंगामात आपली जादू दाखवता आलेली नाही, ज्यामुळे मुंबईच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता उर्वरित १४ सामन्यांमध्ये चौथ्या स्थानासाठी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


