हिंदू एकता आणि सांस्कृतिक जागृतीसाठी सर्व बांधव एकत्र येणार; पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहण्याचे आवाहन!
सावंतवाडी दि.१५: सनातन हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीच्या चिरंतन मूल्यांची जपणूक करण्यासाठी तसेच हिंदू बांधवांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी सावंतवाडीत ‘सकल हिंदू संमेलना’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संघटित होणे ही काळाची गरज असून, याच उदात्त हेतूने या शक्ती उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.
🗓️ कार्यक्रमाचा तपशील:
दिनांक: रविवार, १७ मे २०२६.वेळ: सायंकाळी ठीक ४:०० वाजता.स्थळ: राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी.🎤 प्रमुख मार्गदर्शक आणि वक्ते:
कार्यक्रमाला आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे:
ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज (अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय)डॉ. शिवरत्न शेटे (प्रसिद्ध शिवचरित्रकार व अध्यक्ष, हिंदवी परिवार)श्री. अमित नाईक (मुख्य समन्वयक, ज्ञान प्रबोधनी, सिंधुदुर्ग)ह.भ.प. सायलीताई गावडे महाराज (युवा कीर्तनकार व प्रबोधनकार)🤝 समन्वयक आणि आयोजक:
हिंदू संमेलन समन्वय समितीच्या माध्यमातून श्री. सुहास सातोस्कर (संयोजक), श्री. शांबा (अण्णा) म्हापसेकर, श्री. चंद्रशेखर पारधी, सौ. अपूर्वा माईणकर, सौ. अंजली नातू, श्री. चिन्मय रानडे आणि श्री. आनंद साधले या संमेलनासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
📢 विशेष आवाहन:
सर्व हिंदू माता, भगिनी आणि बांधवांनी आपले सर्व भेदभाव विसरून, सहकुटुंब आणि मित्र परिवारासह पारंपरिक मंगल वेषात या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. “हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमवूया…”


