निरवडे येथे कारचा थरार: भरधाव कार घराच्या भिंतीवर आदळली!

सावंतवाडी दि.१५:  सावंतवाडी-शिरोडा मार्गावरील निरवडे येथे गुरुवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. ही कार थेट रस्त्याकडेला असलेल्या एका घराच्या संरक्षक भिंतीवर जाऊन धडकली. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.
निरवडे येथील धुरी गॅरेजसमोरून जात असताना मारुती कारचा अचानक टायर फुटला. यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने कार वेगाने विनोद नाईक यांच्या घराच्या संरक्षक भिंतीवर आदळली. या धडकेत भिंतीचे आणि कारचे मोठे नुकसान झाले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतर कारमधील व्यक्तींनी नाईक यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दुसऱ्या कारची ‘स्टेपनी’ काढण्याचा प्रयत्न केला. आवाजामुळे ग्रामस्थ जागे झाल्याचे पाहून संशयित आपली कार तिथेच सोडून पळून गेले.

पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.अपघातग्रस्त वाहन जप्त करण्यात आले आहे.हयगयीने वाहन चालवणे आणि चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस हवालदार सुरेश पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here