
आंबोली येथे झालेल्या पहिल्या सहकारी पतसंस्थांच्या अधिवेशनाचे उद्घाटन करताना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी सोबत जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, बाबुराव कविटकर, रवींद्र मडगांवकर, समीर वंजारी, जॉय डान्टस, रमेश बोंद्रे आदी.
सावंतवाडी, दि. २३: “गुणात्मक दृष्ट्या विचार केल्यास आपल्या कोकणात सहकार क्षेत्र खूप मोठे आहे. या सहकाराला अधिक प्रगतीशील आणि आधुनिक रूप द्यायचे असेल, तर सहकार क्षेत्रातील घटकांना प्रशिक्षणाची मोठी गरज आहे,” असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले. सिंधुदुर्ग सैनिक स्कूल येथे, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. आणि माननीय जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय पतसंस्था अधिवेशन २०२६’ च्या मार्गदर्शन शिबिरात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
आपल्या मार्गदर्शनात पुढे बोलताना मनिष दळवी म्हणाले की, पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवणाऱ्या ठेवीदारांचा आणि कर्ज घेणाऱ्या कर्जदारांचा पतसंस्थांकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक आणि मोठा आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे पतसंस्था हे एक मोठे माध्यम आहे. आजच्या डिजिटल बँकिंगच्या युगात जर पतसंस्थांची गुणवत्ता टिकवून ठेवायची असेल, तर प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या पतसंस्थेची प्रगती करत असताना तिचा पाया मजबूत असणे गरजेचे आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. पी. एफ. आणि डॉन्ट्स यांनी लावलेले सहकाराचे रोपटे आता मोठे झाले आहे. फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी या रोपट्याची चांगल्या प्रकारे जपणूक करून त्याला मोठे केले आहे, अशा शब्दांत दळवी यांनी राऊळ यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच फेडरेशनच्या माध्यमातून सर्वांनी मिळून एकत्र येत उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी केले.
भविष्यातही अशा अधिवेशनांना जिल्हा बँकेकडून सदैव सहकार्य राहील, असे आश्वासन मनिष दळवी यांनी दिले. तसेच या अधिवेशनाला ‘मोठ्या भावाच्या’ भूमिकेतून जिल्हा बँकेच्या वतीने १ लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली. यापुढेही जिल्हा बँकेकडून विनामोबदला सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक पर भाषणात बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ म्हणाले की, अशा प्रकारचे अधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच होत आहे. सहकाराच्या माध्यमातून सर्वांची सेवा करणे हे आपले मुख्य कर्तव्य आहे. या शिबिराच्या माध्यमातून पतसंस्थांच्या प्रतिनिधींना योग्य मार्गदर्शन मिळणे आणि वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान संपादन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
या अधिवेशनाला आणि आंबोली येथे झालेल्या पहिल्या सहकारी पतसंस्थांच्या अधिवेशनाचे उद्घाटन करताना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासोबत जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, बाबुराव कविटकर, रवींद्र मडगांवकर, समीर वंजारी, जॉय डान्टस, रमेश बोंद्रे आदींसह जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक, सचिव आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563




