🚨 सावंतवाडी-सिंधुदुर्ग विशेष: १९६५ व १९७१ च्या युद्धातील वीरयोद्धा निवृत्त सैनिक चंद्रकांत पवार यांचे निधन! 🚨

सावंतवाडी दि.२६: देशसेवेचा दैदिप्यमान वारसा लाभलेले, १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील वीरयोद्धे आणि सातार्डा येथील निवृत्त सैनिक हवालदार चंद्रकांत जयराम पवार (वय ८२) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सातार्डा परिसरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. पत्रकार हरिश्चंद्र पवार व इंजिनिअर जयराम (बाळा) पवार यांचे ते वडील होत.

🔹 २६ वर्षे देशसेवा, १५ वर्षे एसटी महामंडळात सेवा:
लहान वयातच सैन्यात दाखल झालेल्या चंद्रकांत पवार यांनी ‘आर्मी सर्व्हिस कोर’ (ASC) मध्ये तब्बल २६ वर्षे देशसेवा केली. निवृत्तीनंतर त्यांनी राज्य परिवहन महामंडळात (MSRTC) बस चालक म्हणून १५ वर्षे सेवा बजावली. कणकवली विभागांतर्गत देवगड, मालवण, कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले अशा विविध डेपोंमध्ये त्यांनी कर्तव्य चोख बजावले होते.

🔹 सैनिकी गणवेश आणि देशप्रेमाची अखंड ज्योत:
वयाच्या ८२ व्या वर्षीही स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी ते कडक इस्त्रीचा युनिफॉर्म, पॉलिश केलेला बेल्ट आणि बूट घालून सैनिकी थाटात ध्वजाला सॅल्यूट देत असत. त्यांचा हा उत्साह तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत होता. गावातील सार्वजनिक रस्त्यासाठी त्यांनी थेट उपोषणाचीही तयारी दर्शवली होती, इतके ते समाजकार्यात अग्रेसर होते.

🔹 शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार:
महिन्याभरापूर्वीच त्यांच्या पत्नी कै. चंद्रावती पवार यांचे निधन झाले होते. त्यानंतर आता पवार कुटुंबियांवर हा दुःखाचा पहाड कोसळला आहे. सातार्डा येथील तरचावाडा वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

🔹 मान्यवरांची मोठी उपस्थिती:
त्यांच्या अंतिम यात्रेत सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये, निवृत्त अधिकारी राजा वाडीकर, निवृत्त मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, निवृत्त गोवा उपजिल्हाधिकारी काशिनाथ सातार्डेकर, पणजी महा न पचे दीपक सातार्डेकर, हुमरस पोलीस पाटील सुरेश चव्हाण, निवृत्त हायस्कूल मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मांजरेकर, नारायण बागकर, ज्येष्ठ नागरिक प्रभाकर मांजरेकर, गजानन शिरसाट, धनंजय केरकर, चर्मकार समाजाचे बांधव पी.बी.चव्हाण, संत रोहिदास सहकारी पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन बाबुराव चव्हाण, गणेश म्हापणकर, दिलीप इन्सुलकर, सुभाष बांबुळकर, उत्तम चव्हाण, महेश चव्हाण, महेश मोचेमाडकर, संदेश मोचेमाडकर,एकनाथ चव्हाण, विजय होडावडेकर,सुधाकर बांदेकर, अशोक चव्हाण, कृष्णा आसोलकर, योगेश्वर कडू, अविनाश होडावडेकर, संग्राम मोरे,अशोक पिळणकर, सतिश काळसेकर संतोष पवार,सत्यदीप सातार्डेकर तुळशीदास पवार,शेखर पवार,सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. सावंत पोलीस अधिकारी शेखर दाभोलकर, किशोर पाटणकर आदींसह शेकडो नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
प्रशांत भूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांना समाज बांधवांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी पीबी चव्हाण यांनी त्यांच्या जीवनातील पैलवान प्रकाश झोत टाकला महिन्यापूर्वी महिन्याभरापूर्वी त्यांची पत्नी कै चंद्रावती पवार ह्याचे दुखत निधन झाले होते त्यानंतर पवार कुटुंबियांवर चंद्रकांत पवार यांच्या मृत्यूने दुःखाचा पहाड कोसळला असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी बोलताना केला यांच्यासह शेकडो ग्रामस्थ, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आणि समाज बांधवांनी उपस्थित राहून या वीरयोद्ध्याला साश्रू नयनांनी श्रद्धांजली वाहिली.देशसेवेसाठी समर्पित राहिलेल्या या महान सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏

###########################

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here