सावंतवाडी दि.३१: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज सावंतवाडी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक बस स्थानकाची पाहणी करून प्रवाशांच्या सोयीसाठी २० नव्या बसगाड्या सावंतवाडी आगाराला देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.
केसरकरांकडून जंगी स्वागत
परिवहन मंत्र्यांचे सावंतवाडीत आगमन होताच माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी उभय नेत्यांमध्ये परिवहन विभागाच्या स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली.
बस स्थानकाची पाहणी
मंत्री सरनाईक यांनी प्रत्यक्ष बस स्थानकावर जाऊन तेथील सोयीसुविधांचा आढावा घेतला. प्रवाशांना उत्तम सेवा मिळावी आणि बस स्थानकाचा दर्जा सुधारावा, यासाठी त्यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या. सावंतवाडीसाठी नवीन गाड्या उपलब्ध करून दिल्याने येथील वाहतूक कोंडी सुटण्यास आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते:
दीपक केसरकर (आमदार),संजू परब (शिवसेना जिल्हाप्रमुख),गणेशप्रसाद गवस (दोडामार्ग तालुकाप्रमुख),दिनेश गावडे (सावंतवाडी तालुकाप्रमुख),बबन राणे, बाबू कुडतरकर, अशोक दळवी,सुस्मिता जाधव (सभापती) यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते. नव्या गाड्यांच्या घोषणेमुळे सावंतवाडीकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


