
देवगड दि.०१: सिंधुदुर्ग पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेअंतर्गत देवगड तालुक्यात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. कोटकामते आडीवरेवाडी येथील एका घराच्या परिसरात अवैधरित्या लागवड केलेली २३ गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली आहेत. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS) गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई २९ मे रोजी करण्यात आली. विशेष म्हणजे जिल्ह्यात गांजाच्या उभ्या पिकाची लागवड पकडण्याची ही पहिलीच कारवाई असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे छापा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटकामते आडीवरेवाडी येथील रहिवासी ओंकार राजाराम कोतेकर (वय ३०) याने आपल्या राहत्या घराच्या परिसरात गांजाच्या पिकाची लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम व उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
पंच, कृषी आणि फॉरेन्सिक पथकाची उपस्थिती
कारवाई दरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी पोलिसांनी दोन शासकीय पंच, कृषी अधिकारी, छायाचित्रकार, वजनकाटाधारक आणि फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण केले होते. या सर्वांच्या उपस्थितीत संशयिताने लागवड केलेल्या गांजाच्या रोपांचा रीतसर पंचनामा करण्यात आला. या कारवाईत ४९ हजार रुपये किमतीची, २ किलो ४५० ग्रॅम वजनाची, ३ ते ५ फूट उंचीची एकूण २३ गांजाची झाडे जप्त करण्यात आली. ही झाडे ताजी, ओलसर आणि गडद हिरव्या रंगाची असून त्यांना उग्र वास येत होता. संशयित आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी ही लागवड केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.
संशयितावर गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलीस हवालदार महेंद्र महाडिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, देवगड पोलिसांनी अवैधरित्या गांजाची लागवड केल्याप्रकरणी संशयित ओंकार कोतेकर याच्याविरुद्ध एनडीपीएस (NDPS) अॅक्ट १९८५ चे कलम ८(क), २०(ब), आणि दोन(ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या यशस्वी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलीस हवालदार महेंद्र महाडिक, गणपती गावडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर आणि रवींद्र महाले या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887


