सावंतवाडी,दि.०२: येथील भोसले संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस आज सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसाचे औचित्य साधून मातोश्री शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते युवराज लखमराजे यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी युवराजांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
या सोहळ्याला राजे खेम सावंत-भोसले, युवराज्ञी तथा नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले, अजय दोडिया, जयश्री दोडिया, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा. दिलीप भारमल, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, दुलारी रांगणेकर, नीलम नाईक, सुकन्या टोपले, दिपाली भालेकर आणि सुनिता पेडणेकर आदी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांसह विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजवाड्यात उपस्थित राहून युवराज लखमराजे भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


