कै. विकासभाई सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम आज

 

सावंतवाडी, दि.१५ : शिक्षण, राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे कै. विकासभाई भालचंद्र सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आज बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० ते ११.३० या वेळेत विनम्र आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सावंतवाडी येथील नवरंग कला मंच, राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे होणार असून, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विकासभाई सावंत यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून होईल. त्यानंतर १०.०५ वाजता बक्षीस वितरण, १०.३० वाजता स्मरणपर भाषणे, ११.२० वाजता अध्यक्षीय भाषण आणि ११.२७ वाजता आभार प्रदर्शन असा कार्यक्रमाचा क्रम राहणार आहे.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, हितचिंतक आणि नागरिकांनी उपस्थित राहून कै. विकासभाई सावंत यांच्या स्मृतींना अभिवादन करावे, असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here