




📌 💥🚗🏥📍 सावंतवाडी दि.१८:
लोकप्रिय आमदार आणि माजी शालेय शिक्षण मंत्री श्री. दीपकभाई केसरकर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदारसंघातील जनतेसाठी आरोग्य, पायाभूत सुविधा, शेती आणि पर्यटनाच्या अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले की, “माझ्यासाठी मंत्रीपदापेक्षा जनतेचे प्रेम आणि मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा आहे.”
🌟 प्रमुख मुद्दे (High-Lights):
🔻 रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधींचा निधी:
🛣️ सावंतवाडी ते आरोंदा रस्ता – ३०० कोटी (प्रस्तावित)
⛰️ तिलारी घाट रस्ता – १२५ कोटी (मंजूर)
🛣️ बांदा ते दाणोली सिमेंट रस्ता – १०० कोटी (मंजूर)
🌊 वेंगुर्ले-बेळगाव मार्गासह आंबोली राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण होणार.
💧 २७० कोटी रुपयांची विस्तारित नळ पाणी योजना.
🛣️ शक्तीपीठ महामार्ग थेट गोव्याला न जोडता मळगाव आणि जिल्हा अंतर्गत रस्त्यांना जोडण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार.
🔻 आरोग्य आणि शिक्षण:
🏥 सावंतवाडीसाठी मंजूर झालेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा जागेचा प्रश्न लवकरच मिटणार; दोडामार्गमध्येही सुसज्ज रुग्णालय उभारणार.
🏫 दुर्गम भागातील मुलांसाठी निवासी शाळांचे काम पूर्णत्वास नेणार.
🔻 कृषी, पर्यटन आणि रोजगार:
🥭 हापूस आंब्यातील ‘साका’ तपासण्यासाठी एक्स-रे (X-Ray) तंत्रज्ञान वापरणार.
🥛 A2 मिल्कपासून तूप निर्मिती (दर ₹३,७०० प्रति किलो) आणि काजू-हळद प्रक्रिया उद्योगातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार.
🐘 दोडामार्ग येथे ‘तिलारी कंजर्वेशन एरिया’मध्ये हत्ती पर्यटन उपक्रम सुरू करणार; इको सेन्सिटिव्ह झोनमधील शेतकऱ्यांना घर आणि फळझाड लागवडीसाठी मार्ग मोकळा करणार.
🏭 आडाळी एमआयडीसीमध्ये कंटेनर निर्मितीसह ४५ नवे उद्योग येणार; बांदा आणि सातार्डा येथेही नवे प्रकल्प.
🩺 विशेष आवाहन: भव्य महाआरोग्य शिबिर!
आमदारांच्या वाढदिवसानिमित्त १८ आणि १९ जुलै रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी होईल आणि गरजेनुसार महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. जनतेने याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा!
💬 राजकीय रोखठोक:
🏹 “बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे पुढे जात असल्याने शिवसेना कोकणात आणि सिंधुदुर्गात नंबर १ वरच आहे. केवळ एक आमदार वगळता सर्व आमदार आमच्याच विचारांचे आहेत.”.
🤝 सामाजिक बांधिलकी: आमदार केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप करून सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, ॲड. नीता सावंत-कविटकर, अशोक दळवी यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.विकासपुरुष आमदार श्री. दीपकभाई केसरकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂


