मायनिंगला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोट्या कारवाया खपवून घेणार नाही; वैभव नाईक यांचा वेंगुर्ले पोलिसांना इशारा! 🚨💥

 

वेंगुर्ले दि.१२: तालुक्यातील शिरोडा येथील शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांच्यावर अमली पदार्थ प्रकरणी झालेली कारवाई ही पूर्णपणे सूडबुद्धीने करण्यात आली आहे, असा थेट आरोप शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. या कारवाईच्या निषेधार्थ त्यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्याला भेट देऊन अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

📌 वैभव नाईक यांच्या भूमिकेतील प्रमुख मुद्दे:

आंदोलकांना अडकवण्याचा कट: वेंगुर्ले आणि सावंतवाडीतील धनदांडग्यांच्या मायनिंग प्रकल्पांविरोधात ग्रामस्थांनी उभारलेल्या आंदोलनात सिद्धेश परब हे अग्रेसर होते. म्हणूनच त्यांच्यावर गांजा बाळगल्याचा खोटा गुन्हा दाखल करून गोवण्यात आले आहे.

पक्ष बाजूला ठेवून पाठीशी: कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो, मायनिंग आणि चुकीच्या धोरणांविरोधात लढणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू.

तपासावर संशय: वेंगुर्ले तालुक्यात वर्षभरात अमली पदार्थांची एकही केस नसताना थेट मायनिंग विरोधी आंदोलकावरच ही कारवाई कशी झाली? या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्याकडून काढून घेऊन अन्य सक्षम अधिकाऱ्याकडे द्यावा.

सूडबुद्धीचा पायंडा: जिल्ह्यातील आंबा-काजू शेतकरी, अणुऊर्जा प्रकल्प आणि एलईडी मच्छिमारीविरोधी आंदोलकांवर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली गुन्हे दाखल केले जात असून, हा चुकीचा पायंडा थांबला पाहिजे.

या वेळी जि. प. सदस्य संजय गावडे, विजय नाईक, काँग्रेसचे इर्शाद शेख, अभय शिरसाट, सुमन कामत यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी आमचे चॅनेल subscribe करा

https://www.facebook.com/akhandhindustanlive/

https://www.instagram.com/akhandhindustanlive1

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here