🚆 सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा ३.२८ कोटींतून विस्तार!
कोकण रेल्वे प्रशासनाने सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूला नवीन सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
✅ पूर्व बाजूला तिकीट बुकिंग कार्यालय, अत्याधुनिक प्रतीक्षा कक्ष (लाउंज), पीआरएस केंद्र उभारले जाणार.
✅ आगामी दीड वर्षात काम पूर्ण करण्याचे नियोजन (कोकण रेल्वे अध्यक्ष संतोष कुमार झा).
⚠️ पण चाकरमान्यांची चिंता काय?
पूर्वेकडील राखीव जागेत रेल्वे प्रशासन इमारत बांधण्याचे नियोजन करत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
👉 या जागेवर इमारत झाल्यास भविष्यात टर्मिनससाठी आवश्यक असलेले अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि लूपलाईनचे काम होणे अशक्य होईल.
👉 “सावंतवाडी टर्मिनस केवळ कागदावरच उरणार का?” असा सवाल आता प्रवासी विचारत आहेत.
📢 “एक व्हिडिओ, एक आवाज – सावंतवाडी टर्मिनस आमचा हक्क!”
कोकणी चाकरमान्यांनी आणि स्थानिकांनी सावंतवाडी टर्मिनसच्या मागणीसाठी १५ ते ३० सेकंदांची व्हिडिओ मोहीम सुरू केली आहे.
📌 प्रमुख मागणी: सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाचा समावेश कोकण रेल्वेच्या तिसऱ्या आर्थिक पुनर्रचना पॅकेजमध्ये करावा आणि तातडीने नवीन प्लॅटफॉर्म व लूपलाईनचे काम सुरू करावे.
🔥 कोकण रेल्वेचा १९९ कोटींचा नफा, मग प्रवाशांचे हाल का?
एकीकडे कोकण रेल्वे महामंडळाने ३७ व्या स्थापना दिनानिमित्त १९९ कोटींच्या निव्वळ नफ्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे सणासुदीच्या काळात चाकरमान्यांना डब्यात उभे राहायलाही जागा मिळत नाही.
“परदेशात प्रकल्प राबवणाऱ्या रेल्वे प्रशासनाने आधी कोकणी प्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात,” अशी संतप्त प्रतिक्रिया संजय सावंत यांच्यासह हजारो कोकणवासियांनी व्यक्त केली आहे.
✊ कोकणच्या हक्कासाठी आणि टर्मिनसच्या पूर्णत्वासाठी हा मेसेज प्रत्येक कोकणी ग्रुपवर शेअर करा!



