सावंतवाडीत आमदार दीपक केसरकर यांच्याकडून व्यापाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा; महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर होण्यासाठी लक्ष्मीचरणी प्रार्थना! 🪔✨

 🪔✨

दीपावली व लक्ष्मी-कुबेर पूजनाच्या औचित्यावर माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठांना प्रत्यक्ष भेट देऊन सर्व व्यापारी बांधवांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी त्यांनी व्यापारी पेठांमधील पूजित लक्ष्मीच्या मूर्तींचे दर्शन घेऊन व्यापारी, बागायतदार, शेतकरी, महिला आणि मच्छिमार बंधू-भगिनींच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर यांच्या उपस्थितीत निवासस्थानी विधिवत पूजन केल्यानंतर आमदार केसरकर यांनी शहरात फिरून व्यापाऱ्यांशी संवाद साधला. “लक्ष्मीची अखंड कृपा संपूर्ण महाराष्ट्रावर राहो आणि राज्यातील दुष्काळाचे कठीण सावट दूर होवो,” असे साकडे त्यांनी या वेळी देवी लक्ष्मीच्या चरणी घातले.

या दौऱ्यादरम्यान या दौऱ्यादरम्यान शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर, नगरसेवक देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, महिला शहरप्रमुख भारती मोरे, परिक्षीत मांजरेकर, विश्वास घाग, आबा केसरकर, अर्चित पोकळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here