आंबोली येथील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे सेनेमध्ये प्रवेश देताना जिल्हाप्रमुख संजू परब सोबत राजेश मोरे, दिनेश गावडे, मायकल डिसोजा, विलास गावडे, जगन्नाथ गावडे, अरुण गावडे आदी
अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश
सावंतवाडी दि.०१:
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आंबोली परिसरात मोठा धक्का बसला असून, ठाकरे शिवसेना गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश पक्ष निरीक्षक राजेश मोरे यांच्या हस्ते तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
आंबोली जिल्हा परिषद गटातील ठाकरे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख बुधाजी पाताडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य महेश पावसकर, निधी गुरव, राजा गुरव, रामचंद्र आमडोस्कर, निखिल गुरव, जी. जी. राऊत, गोविंद जाधव, संजय राऊत, सुनील राऊत, शोभना राऊत, रिया पाताडे, संजय पडते, बाबुराव शेळके, लक्ष्मण जाधव, कांता गुरव, अनिल मेस्त्री, केशव जाधव आदी उबाठा गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रवेशामुळे आंबोलीसह संपूर्ण जिल्हा परिषद गटात शिवसेनेची ताकद वाढली आहे. प्रवेशानंतर बोलताना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सांगितले की, शिवसेनेची विचारधारा, संघटनशक्ती आणि विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून कार्यकर्ते पक्षात दाखल होत आहेत. आगामी काळात शिवसेना अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पक्ष निरीक्षक राजेश मोरे, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, पंचायत समितीचे उमेदवार मायकल डिसोजा, विभाग प्रमुख विलास गावडे, माजी सरपंच जगन्नाथ गावडे, अरुण गावडे, नंदू गावडे, विशाल बांदेकर, उत्तम नार्वेकर आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे ठाकरे शिवसेना गटाला मोठा धक्का बसला असून, आंबोली परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आंबोली येथील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे सेनेमध्ये प्रवेश देताना जिल्हाप्रमुख संजू परब सोबत राजेश मोरे, दिनेश गावडे, मायकल डिसोजा, विलास गावडे, जगन्नाथ गावडे, अरुण गावडे आदी