
दोडामार्ग दि.०२ : माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख श्री. बाबुराव धुरी यांनी निवडणूक रिंगणात उतरत प्रचाराला वेग दिला आहे. गावोगाव भेटी, नागरिकांशी थेट संवाद, बैठका तसेच प्रचार फेऱ्यांमुळे त्यांच्या प्रचाराला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. संघटनात्मक कामात सक्रिय असलेले बाबुराव धुरी हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. सामाजिक आणि सार्वजनिक कामातून त्यांची मतदारसंघात स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुभव आणि संघटनात्मक बांधणीच्या जोरावर त्यांनी ग्रामीण विकासाशी संबंधित प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण, शेतकरी प्रश्न तसेच युवकांच्या रोजगार संधी यासारख्या विषयांवर त्यांनी प्रचारादरम्यान स्पष्ट भूमिका मांडली आहे.
प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत मतदारसंघातील समस्या समजून घेणे, प्रलंबित विकासकामांचा आढावा घेणे आणि पुढील नियोजनाबाबत नागरिकांशी चर्चा करण्यावर त्यांचा भर आहे. “जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावातील मूलभूत सुविधा सक्षम करणे हेच माझे प्राधान्य राहील,” असे बाबुराव धुरी यांनी सांगितले. सध्या मतदारसंघात विविध गावांमध्ये त्यांच्या प्रचार सभा, बैठका आणि जनसंवाद कार्यक्रम सुरू असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी काळात मतदारसंघातील विकासात्मक प्रश्नांवर केंद्रित प्रचार करत जनतेपर्यंत आपली भूमिका पोहोचवण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पासपोर्ट फोटो बाबुराव धुरी


