सावंतवाडीत विशाल परब यांचा ‘अ‍ॅक्शन मोड’!

मतदान झाल्यानंतर तळवडे जिल्हा परिषद मतदार संघाचे भाजपचे युवा उमेदवार संदीप गावडे यांचे अभिनंदन करताना भाजपा युवा नेते विशाल परब सोबत पदाधिकारी

तळवड्यात बुथवरआढावा; संदीप गावडेंसह महायुतीच्या विजयाचा निर्धार

सावंतवाडी दि.०७: तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदानाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.या पार्श्वभूमीवर भाजपचे युवानेते विशाल परब यांनी आज स्वतः मैदानावर उतरून विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या आणि निवडणूक प्रक्रियेचा थेट आढावा घेतला. तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात विशाल परब यांनी प्रत्येक बुथवर जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला, ज्यामुळे संपूर्ण मतदारसंघात भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच जोश पाहायला मिळत आहे.​तळवडे येथे भेट दिली असता विशाल परब यांनी जिल्हा परिषद उमेदवार तथा युवा नेते संदीप गावडे आणि इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले की, मतदारसंघातील मतदारांचा कल आणि कार्यकर्त्यांची मेहनत पाहता, काहीही झाले तरी भाजप- शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महायुतीच्या गोटात विजयाचा विश्वास अधिक दृढ झाला असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.​या पाहणी दौऱ्यात विशाल परब यांच्यासोबत माजी सभापती पंकज पेडणेकर,रवींद्र परब आणि भाजपचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here