सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर सोबत नगरसेविका नीलम नाईक
सावंतवाडीच्या ५७ कोटींच्या पाणी योजना मे २०२७ पर्यंत योजना पूर्ण करण्याचे आश्वासन; ५ हजार नळ जोडणीचे उद्दिष्ट
सावंतवाडी दि.१७: शहराच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ५७ कोटींच्या नव्या नळपाणी योजनेच्या कामात कोणतेही राजकारण न करता, जनतेच्या सूचनांचा आदर करून हे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण केले जाईल. मे २०२७ पर्यंत ही योजना पूर्णत्वास नेऊन शहरवासीयांना मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्याची ग्वाही नवनिर्वाचित पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी दिली.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेविका नीलम नाईक यांचीही उपस्थिती होती.
कामाचा आढावा आणि सद्यस्थिती
पाणीपुरवठा सभापती पदाची धुरा सांभाळल्यानंतर बांदेकर यांनी पाळणेकोंड धरणावर सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. या योजनेबाबत त्यांनी खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले:
मंजुरी: आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून २०२३ मध्ये या ५७ कोटींच्या योजनेस मंजुरी मिळाली.
विलंबाची कारणे: तांत्रिक अडचणी आणि विविध परवानग्यांमुळे सद्यस्थितीत केवळ २० टक्के काम पूर्ण झाले आहे.प्रलंबित परवानग्या: सार्वजनिक बांधकाम विभाग, कोलगाव आणि केसरी ग्रामपंचायत यांच्याकडील परवानग्या मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच कामाला गती मिळेल.
गुणवत्तेवर भर आणि तज्ज्ञांची समिती
कामातील त्रुटींविषयी बोलताना बांदेकर म्हणाले की, “प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केल्यानंतर काही त्रुटी आढळल्या होत्या, त्याबाबत ठेकेदाराला कडक सूचना देण्यात आल्या आहेत. कामाचा दर्जा राखण्यासाठी निवृत्त पाणीपुरवठा अधिकारी व तज्ज्ञांची एक समिती नेमण्यात आली आहे, जी तांत्रिक देखरेख करेल.”
भविष्यातील उद्दिष्टे आणि नागरिकांना दिलासा
नळ जोडणी: सध्या शहरात ३,५०० ग्राहक असून, नवीन योजनेनंतर हे उद्दिष्ट ५,००० पर्यंत नेण्यात येणार आहे.टंचाईग्रस्त भागाला प्राधान्य: उभाबाजार, झिरंग आणि माठेवाडा या भागांतील पाणीटंचाई लक्षात घेता, तिथल्या मुख्य पाईपलाईनचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे.रस्त्यांची दुरुस्ती: कामासाठी खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पावसाळ्यापूर्वी खडीकरण आणि पावसाळ्यानंतर तातडीने डांबरीकरण करण्यात येईल.
“जनतेच्या हितासाठी या योजनेत कोणतेही राजकारण आडवे येऊ दिले जाणार नाही. शहरवासीयांना शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळावे, हेच आमचे एकमेव ध्येय आहे,” असे बांदेकर यांनी शेवटी स्पष्ट केले.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563