शांतता समितीच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना डीवायएसपी विनोद कांबळे सोबत पी आय अमोल चव्हाण व अन्य
Dysp विनोद कांबळे यांचे आवाहन;शांतता समितीची बैठक संपन्न
सावंतवाडी,दि.१७: आगामी काळातील सर्व सण आणि उत्सव नागरिकांनी अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरे करावेत. समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वच स्तरातील नागरिकांनी आणि समाजघटकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी केले आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदकर प्रामुख्याने उपस्थित होते.
या महत्त्वाच्या बैठकीमध्ये आगामी काळात येणाऱ्या शिवजयंती, रमजान ईद, शिमगोत्सव, होळी, रंगपंचमी आणि गुढीपाडवा या सणांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कोकणातील सण-उत्सवांना मोठी ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा आहे. ही परंपरा जोपासताना कोणत्याही प्रकारे सामाजिक सलोखा बिघडणार नाही किंवा उत्सवाला गालबोट लागणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या. उपस्थित शांतता समितीच्या सदस्यांनी आणि मान्यवरांनीही प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत, सर्व सण आदर्श पद्धतीने साजरे करण्याची ग्वाही दिली.
बैठकीचे औचित्य साधून उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच तौकीर शेख यांची नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, पत्रकार अभिमन्यू लोंढे, हिदायतुल्ला खान,ऑगोस्तीन फर्नांडिस, संजय लाड, कृष्णा धुळपनावर, साईराज नार्वेकर, दिनेश गावडे, विनायक रांगणेकर यांच्यासह अखिल भारतीय मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष अभिषेक सावंत, मनोज घाटकर, पोलीस कर्मचारी अमित राऊळ आणि शांतता समितीचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563