
सावंतवाडी दि.०१: आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूलचे, माजी मुख्याध्यापक गुरुवर्य रा. गो. सामंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्याविहार इंग्लिश स्कूल, आजगाव येथे समूहगीत गायन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तेजनार्थ श्रेणी पटकावली. या विद्यार्थ्यांमध्ये प्रशालेतील इयत्ता सातवी मधील कु. अस्मी प्रभू तेंडोलकर, कु. स्पृहा आरोंदेकर, तर इयत्ता पाचवी मधील कु. लिशा सामंत, कु. जान्हवी सावंत, कु. गायत्री तानावडे, कु. फेथ फर्नांडिस, कु. ऐश्वर्या तेली, कु. उगम वेर्लेकर, कु. योगांक कारिवडेकर, कु. काविश पेडणेकर, कु. प्रजय सावंत व इयत्ता चौथी मधील कु. वेद बेळगावकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वरील विद्यार्थ्यांनी या जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत उत्तेजनार्थ श्रेणी पटकावली. वरील सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील संगीत शिक्षक श्री. कपिल कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेतील संगीत शिक्षक श्री. कपिल कांबळे यांना व वरील स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रशालेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी वरील स्पर्धेत सहभागी सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


