कवठणी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

आरोंदा जि प चे सदस्य सुदन कवठणकर यांचा सन्मान करतांना

सिंधूमित्र सेवा-सहयोग प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत कवठणी यांचा स्तुत्य उपक्रम

सावंतवाडी दि.०१:कवठणी येथील श्री देवी माऊली विद्या मंदिर येथे आज, १ मार्च २०२६ रोजी सिंधूमित्र सेवा-सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी आणि ग्रामपंचायत कवठणी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे उद्घाटन
शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. सुदन सोनु कवठणकर, पंचायत समिती सदस्य श्री. उदय श्रीकांत पारिपत्ये, कवठणीचे सरपंच श्री. अजित शंकर कवठणकर आणि सिंधूमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे प्रमुख उपस्थित होते.

तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग
या शिबिरात विविध रोगांवर मार्गदर्शन व उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची फौज उपस्थित होती. यामध्ये डॉ. शंकर सावंत,डॉ. स्वप्नील परब,डॉ. स्वाती पाटील,डॉ. विशाल पाटील,डॉ. स्नेहल परब,डॉ. मुग्धा ठाकरे,डॉ. नंदादीप चोडणकर या डॉक्टरांनी रुग्णांची सखोल तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार व आरोग्याबाबत मोलाचा सल्ला दिला.

याप्रसंगी उपसरपंच सौ. श्रद्धा कवठणकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. अजय सावंत, आरोग्य सेविका प्रमिला यमगेकर यांच्यासह शाळेचे शिक्षक व कवठणी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी असे उपक्रम होणे गरजेचे आहे. सिंधूमित्र प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत यांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे,” असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here