बांदा येथील चर्मकार बांधवांच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास यांची ६५० वी जयंती उत्सवात सुधाकर बांदेकर मनोगत व्यक्त करतांना सोबत जगदीश चव्हाण, बाबुराव चव्हाण, गणेश म्हापणकर, इन्सुलकर नरशू रेडकर आदी पदाधिकारी
बांदा येथे चर्मकार समाजाचा स्तुत्य उपक्रम; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव
सावंतवाडी दि.०१: संत शिरोमणी रोहिदास यांची ६५० वी जयंती बांदा येथील चर्मकार बांधवांच्या वतीने रविवार, १ मार्च २०२६ रोजी बांदा ग्रामपंचायतीच्या सभागृहात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात समाजातील गुणवंतांचा सत्कार आणि संत रोहिदास यांच्या विचारांचे मंथन करण्यात आले.
जीवनकार्यावर प्रकाश
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत रोहिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी श्री. नरेश कारिवडेकर आणि श्री. पी. बी. चव्हाण यांनी संत शिरोमणी रोहिदास यांच्या जीवनकार्यावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. संतांचे विचार आजच्या काळात कसे उपयोगाचे आहेत, यावर त्यांनी प्रकाश टाकला.
गुणवंतांचा सत्कार
विविध क्षेत्रांत विशेष कामगिरी केल्याबद्दल बांदावासीयांच्या वतीने खालील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला: यामध्ये
श्री. चंद्रशेखर बांदेकर,श्री. संदीप बांदेकर,सौ. दिपाली बांदेकर तर,बांदा सरपंच श्री. अक्रम खान, ॲड. अनिल निरवडेकर आणि श्री. विनायक चव्हाण हे अपरिहार्य कारणास्तव अनुपस्थित राहिल्याने त्यांचा सत्कार होऊ शकला नाही, मात्र श्री. सुधाकर बांदेकर यांनी त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करून त्यांचे आभार मानले.यावेळी सचिव श्री. जगदीश चव्हाण, बाबुराव चव्हाण, गणेश म्हापणकर, इन्सुलकर नरशू रेडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सुधाकर बांदेकर यांचा विशेष सन्मान
या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी आणि आर्थिक भार श्री. सुधाकर बांदेकर यांनी समाजाच्या सहकार्याने स्वखर्चातून यशस्वीरित्या उचलला. त्यांच्या या निस्वार्थी कार्याची दखल घेऊन चर्मकार समाज कार्यकारिणीमार्फत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री. रुपेश बांदेकर यांनी केले. या कार्यक्रमाला बांदा परिसरातील चर्मकार समाजातील बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563