🚨 🚨 इराण दि.०५: इराणमधील युद्धजन्य परिस्थितीत सावंतवाडीचा सुपुत्र रोहन नंदकिशोर धुरी याच्यासह ४० भारतीय तरुण मृत्यूच्या छायेत अडकले आहेत. ‘एम.व्ही. मनाली’ (MV Manali) या जहाजावर असलेल्या या तरुणांनी व्हिडिओद्वारे भारत सरकारकडे मदतीची याचना केली आहे.
📍 काय आहे भीषण परिस्थिती?
डोळ्यांसमोर बॉम्बवर्षाव: जहाजाच्या आसपास समुद्रात क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब पडत असल्याने सर्व तरुण प्रचंड दहशतीत आहेत.
४० भारतीयांचा जीव धोक्यात: रोहनसोबत उत्तर प्रदेशचा राम शिवकुमार आणि इतर ३८ भारतीय तरुण या जहाजावर अडकले आहेत.
“कोणत्याही क्षणी राख होऊ”: “आम्ही सध्या मरणाच्या दारात आहोत, कधीही आमच्यावर बॉम्ब पडू शकतो,” असा हृदयद्रावक संदेश या तरुणांनी दिला आहे.
🙏 कुटुंबाची धास्ती:
रोहन हा सावंतवाडीतील ॲड. नीता गावडे यांचा पुतण्या आहे. आपल्या मुलाला आणि इतर सहकाऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने युद्धजन्य परिस्थितीतून सहीसलामत मायदेशी आणावे, अशी विनंती कुटुंबियांनी केली आहे.
📢 ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही हाक प्रशासनापर्यंत पोहोचेल! असे आवाहन केले जात आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


