संपादकीय
नमस्कार,
अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज चॅनल ची ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सुरू करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ‘सत्य सामर्थ्य आणि संकल्प’ ही टॅग लाईन घेऊन या तत्त्वावर चालण्याचे व्रत घेऊन चॅनेलची सुरुवात करत आहोत. यामध्ये ज्ञान मनोरंजन आणि ताज्या बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे देशभराच्या बातम्या बरोबर सत्य घटना या निमित्ताने आपणासमोर आणत असताना अखंड हिंदुस्थानचा प्रचारक होऊ इच्छित आहोत.
आपला हिंदुस्तान देश जात धर्म भाषा प्रांत मध्ये विभागला जाऊ शकत नाही सर्वधर्म समभाव मानणारा आपला देश आहे या देशाची कला, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय स्थिती अधिक उजळ व्हावी प्रांताप्रांतामध्ये समृद्धी यावी घराघरांमध्ये लक्ष्मीची पावले यावीत अशी मनोकामना व्यक्त करत असताना सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करत अखंड हिंदुस्तान लाईव्ह सुरू करत आहोत. या यूट्यूव चैनलची सुरुवात कोकण आणि महाराष्ट्रापासून करत असताना काश्मीर ते कन्याकुमारी पर्यतच्या महत्त्वाच्या घडामोडी आणि बातम्यांचाही यामध्ये समावेश असेल. ‘दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा’! याचा आम्हाला अभिमान आहे.
कवी वसंत सावंत यांची ‘अशा लाल मातीत जन्मास यावे’ ही कविता कोकणच्या भूमीचे सौंदर्य, तिथला निसर्ग आणि तिथल्या माणसांचे कष्टकरी जीवन यांचे अत्यंत प्रभावी दर्शन घडवते. ‘अशा लाल मातीत जन्मास यावे’या कवितेतून कवी वसंत सावंत यांनी अशा लाल मातीत जन्मास यावे जिथे रावणार्यास मान मिळावा अशा घाम-घामानं भिजल्या शरीरी नव्या अस्मितेचा प्रकाश मिळावा. अशा तृप्त मातीत जन्मास यावे. अशा कष्टकऱ्यांच्या पवित्र कुळी पुन्हा एकदा मी जन्मास यावे. असे सांगतात.
कवी वसंत सावंत यांच्या ‘स्वस्तिक’ या काव्यसंग्रहातील कवितेच्या ओळी आणि त्याचा अर्थ खूप काही सांगून जातो. कवी वसंत सावंत यांनी कोकणची अस्मिता ही कविता कोकणच्या लाल मातीचा आणि तिथल्या संस्कृतीचा गौरव करते. श्रमाची पूजा करते. निसर्ग वर्णनात माड-पोफळी (नारळ-सुपारीच्या बागा), समुद्र आणि सह्याद्रीच्या कड्यांचे सुंदर चित्रण करते अगदी त्याचप्रमाणे अखंड हिंदुस्तान लाईव्ह चॅनल त्यांच्या काव्यार्थीला अभिप्रेत असे काम करू पाहत आहे. कोकणची जशी लाल माती तशी देशावरची काळी आई ! रंग वेगळा परंतु गुणधर्म एकच, सोन पिकवणे. अशा मातीशी प्रामाणिक राहून कष्टकरी बळीराजाच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांच्या व्यथा मांडण्याचे काम आम्ही करणार आहोत.
‘जय जवान जय किसान’ चा नारा घेऊन अखंड हिंदुस्थान लाईव्ह न्युज चॅनल सुरू होत आहे. सीमेवर लढणारा जवानांचा जय जयकार करत असताना मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांचाही जय जयकार व्हायला हवा. अगदी छोट्या बालकांपासून तरुण-तरुणी आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आवडेल रुचेल असा अखंड हिंदुस्थान लाईव्ह न्युज असेल. असत्यावर आसूड, सामथ्याची जाणीव आणि सुख-समृद्धीचा संकल्प घेऊन अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्युज चॅनल आपणांसमोर येत आहे.
चला तर मग बेल आयकॉनवर बटन दावा आणि चॅनल सबस्क्राईब करा.



