
वेंगुर्ला दि.२९:तालुक्यातील
शिरोडा गावात अमली पदार्थ विक्री व गैर व्यवसाय सुरु आहेत व ही बाब गंभीर आहे. याबाबत शिरोडा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी वेंगुर्ला पोलिसांना निवेदन देत लक्ष वेधले आहे.
शिरोडा गावात ब-याच ठिकाणी चायनीय सेंटर, समुद्र किनारी, मिठागर परिसर, उपजिल्हा रुग्णालय शिरोडाच्या मागील बाजूस या परिसरात गांजा, चरस, अंमली पदार्थ रात्रौ राजरोसपणे विक्री करुन सेवन केल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेत शिरोडा परिसरात नागरिकांच्या असुरक्षितेचे वातावरण निर्माण झालेले आहे. या प्रकारामुळे अमली पदार्थ विक्री करणा-यांकडून गुंडगिरी करुन दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी पर्यटनदृष्टया महत्वाच्या असलेल्या शिरोडा गावात अनैतिक धंद्यांना आळा घालावा, अन्यथा या विरुद्ध मोठे आंदोलन करण्यातं येईल. शिरोडा गावात अमली पदार्थ विक्री सह गैर व्यवसाय सुरु असल्याची बाब समोर येत आहे. याबाबत त्वरित पुढील कार्यवाही व्हावी, अशी मागणी शिरोडा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शिरोडा ग्रामस्थ अमोल परब, दत्तगुरु परब, मयुरेश शिरोडकर, भिवा गावडे, भरत शेटये, माजी उपसरपंच राहुल गावडे, अमित गावडे, कौशिक परब, गणपत साळगावकर, प्रशांत गावडे, देऊ परब, दीक्षांत परब, विजय परब, उद्धव परब, सचिन जेठे, वेदांत परब, निखिल गावडे, ओम परब, आदित्य घोडके,माजी सरपंच मनोज उगवेकर आदी उपस्थित होते.दरम्यान शिरोड्यातील गंभीर प्रकाराबाबत त्वरित दखल न घेतल्यास सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांची सोमवारी भेट घेण्यात येणार आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https: // akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887, 8275659563


