📍 सावंतवाडी दि.१७:माजगावच्या राजकारणातून मोठी बातमी! ग्रामपंचायत सरपंचपदासाठीची चुरस आता शिगेला पोहोचली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले असून आता भाजप पुरस्कृत उमेदवार विरुद्ध अपक्ष उमेदवार यांच्यात ‘थेट सामना’ रंगणार आहे.
💥 काय घडले अर्ज माघारीच्या दिवशी?
सुरुवातीला सरपंचपदासाठी ४ महिला उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र, श्रद्धा मुकुंद सावंत आणि सपना सतीश गावडे यांनी माघार घेतल्यामुळे आता मैदानात केवळ दोनच उमेदवार उरले आहेत:
१) रंजना रवींद्र कानसे २) जयश्री दिनेश सावंत
✅ दोन सदस्य आधीच बिनविरोध! सरपंचपदासाठी लढत होत असली, तरी सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत मात्र बाजी मारली गेली आहे:🔹 प्रभाग क्र. ४: राजीवी रुपेश पेडणेकर (बिनविरोध निवड)🔹 प्रभाग क्र. २: अनघा प्रदीप धुरी (बिनविरोध निवड) 👨ा निवडणूक अधिकारी: यशवंत परब (कृषी अधिकारी)
माजगावची जनता कोणाच्या पारड्यात मत टाकणार? भाजपचा गड राखला जाणार की अपक्ष उमेदवार बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563


