🚨 कोकण रेल्वेच्या मनमानी कारभाराचा प्रवाशांना फटका!📍 सावंतवाडी रोड स्थानकाची परिस्थिती गंभीर

वाशी नवीमुंबई दि.२२: कोकण रेल्वेमार्गावरून धावणारी ‘वास्को-पटना एक्सप्रेस’ आता स्थानिक कोकणी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दर बुधवारी धावणारी ही गाडी वास्को आणि मडगाव स्थानकांवरूनच तुडुंब भरून येत असल्याने सावंतवाडी स्थानकावर प्रवाशांना गाडीत चढणेही अशक्य झाले आहे.

काय आहेत समस्या?
❌ आरक्षित डब्यात घुसखोरी: आरक्षित डब्यांचे रूपांतर जनरल डब्यांत झाले आहे. तिकीट काढूनही प्रवाशांना आपल्या हक्काच्या जागेवर बसता येत नाही.
❌ सुरक्षेचा प्रश्न: परप्रांतीयांच्या प्रचंड गर्दीमुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाची असुरक्षितता वाढली आहे.
❌ आर्थिक नुकसान: गाडीत चढणे अशक्य झाल्याने अनेक प्रवाशांना तिकीट रद्द करावे लागते, ज्यामुळे रेल्वेचेही आर्थिक नुकसान होत आहे.

📢 स्थानिकांची मागणी:
“ज्या गाडीचा उपयोग कोकणी माणसाला नाही, ती गाडी आमच्या मार्गावर कशाला?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. वास्को-पटना एक्सप्रेस नको, तर पुणे-सावंतवाडी आणि कल्याण-सावंतवाडी या मार्गांवर हक्काच्या स्वतंत्र गाड्या सुरू करा!
रेल्वे प्रशासन कोकणी प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष कधीपर्यंत करणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here