यशवंत शिष्यवृत्ती परीक्षेत संस्कृती चोपडे तालुक्यात अव्वल…​संदीप गावडे फाऊंडेशनचे आयोजन; ३० एप्रिलला सावंतवाडीत बक्षीस वितरण

सावंतवाडी,दि.२६: ​संदीप गावडे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, यामध्ये माडखोल धवडकी शाळा नं. २ ची विद्यार्थिनी संस्कृती चोपडे हिने २०० पैकी १८२ गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप गावडे, परीक्षा समितीचे अध्यक्ष सुधीर गावडे, सचिव दत्ताराम सावंत आणि समीर जाधव यांच्या उपस्थितीत हा निकाल घोषित करण्यात आला. ​या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा कुणकेरी नं. २ ची विद्यार्थिनी आराध्या झोरे १८० गुणांसह द्वितीय आली आहे. तृतीय क्रमांकावर सावंतवाडी शाळा नं. २ चा राहील शेख, चौथ्या क्रमांकावर तळवणे शाळा नं. ४ चा गौरांग वैज आणि पाचव्या क्रमांकावर तळवणे शाळा नं. ४ ची श्रावणी कवडे यांनी झेप घेतली आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १७२ गुण मिळवले आहेत. यंदा या परीक्षेसाठी एकूण ३२८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी २४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेचा एकूण निकाल ७४.०८ टक्के लागला आहे.​या यशाबद्दल गावडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेतील पहिल्या पाच यशस्वी विद्यार्थ्यांना सायकल देऊन गौरविण्यात येणार आहे, तर त्यानंतरच्या ७५ विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू, पदक आणि प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.​सन २०२५ आणि २०२६ चा संयुक्त बक्षीस वितरण सोहळा ३० एप्रिलला दुपारी २.०० वाजता सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै नगरपालिका हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वंदना सावंत, तेजस्विता वेंगुर्लेकर, उद्देश नाईक यांच्यासह संदीप गावडे फाउंडेशनच्या संपूर्ण कार्यकारिणीने आणि अभ्यासक्रम मंडळाने विशेष मेहनत घेतली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here