सावंतवाडी दि.०८: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात सावंतवाडी तालुक्याने ९८.५९ टक्के निकालासह उज्वल यश संपादन केले आहे. तालुक्यातून एकूण १,७०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १,६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये ९०० मुले व ७८४ मुलींचा समावेश आहे. यंदाच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातील ४६ शाळांपैकी तब्बल ३० विद्यालयांनी १०० टक्के निकालाची नोंद केली आहे.
तालुक्याच्या गुणवत्ता यादीत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व गाजवले आहे. मिलाग्रीसची विद्यार्थिनी भार्गवी अंकुश शेटवे हिने १०० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. याच शाळेचा कृष्णा महेश पास्ते ९९.४० टक्के गुणांसह द्वितीय, तर विराज नंदकिशोर राऊळ ९९ टक्के मिळवून तालुक्यात तृतीय आला आहे. आरपीडी हायस्कूलचा योगेश जोशी (९८.८० टक्के) आणि कळसुलकर हायस्कूलची मृणाली देसाई (९७.८० टक्के) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.
शाळानिहाय निकालाचा विचार करता, सावंतवाडीतील मिलाग्रीस हायस्कूल, कळसुलकर इंग्लिश स्कूल, शांतीनिकेतन इंग्लिश मीडियम, मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी सेंट्रल इंग्लिश स्कूल आणि माजगावचे भाईसाहेब सावंत विद्यालय यांनी १०० टक्के यशाची परंपरा कायम राखली. ग्रामीण भागातही कुणकेरी, माडखोल, सोनुर्ली, आंबोली पब्लिक स्कूल, सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली विद्यानिकेतन, चौकूळ इंग्लिश स्कूल, आरोस विद्याविकास, नेमळे हायस्कूल, शिरशिंगे, असनिये, दाणोली, निरवडे, विलवडे आणि डेगवे येथील माध्यमिक विद्यालयांनी १०० टक्के निकाल लावला आहे.
सावंतवाडीतील आरपीडी हायस्कूलचा निकाल ९९.२० टक्के लागला, तर बांदा येथील दिव्य ज्योती इंग्लिश स्कूलने ९६.७७ टक्के गुणांची नोंद केली. इतर शाळांमध्ये ओटवणे (९५.८३ टक्के), तळवडे (९५.३८ टक्के), आरोंदा (९६.१५ टक्के), कलंबिस्त (९७ टक्के), सांगेली (९५.१२ टक्के) आणि मळगाव हायस्कूलने ९७.०५ टक्के निकाल मिळवला आहे. तसेच सेंट्रल उर्दू हायस्कूलचा निकाल ९३.७५ टक्के, कोलगाव हायस्कूलचा ९२.८५ टक्के आणि वि. स. खांडेकर विद्यालयाचा निकाल ९० टक्के लागला आहे.
तालुक्यात प्रथम आलेल्या भार्गवी शेटवे हिने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, आई-वडील आणि भावाला दिले आहे. तिचे वडील माजी सैनिक असून, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन नॅशनल डिफेन्स अकॅडमीची (NDA) परीक्षा देऊन देशसेवा करण्याचे स्वप्न तिने यावेळी व्यक्त केले. या घवघवीत यशाबद्दल तालुक्यातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


