पुणे/सावंतवाडी दि.१२: रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राची आणि विशेषतः कोकणी चाकरमान्यांची सतत फसवणूक सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुण्यातून कोकणासाठी हक्काची गाडी देण्यास तांत्रिक अडचणींचे कारण सांगणाऱ्या मध्य रेल्वेने, आता थेट बिहारसाठी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ मंजूर करून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
मध्य रेल्वेचा दुजाभाव: काय आहे नेमके प्रकरण?
काही दिवसांपूर्वी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुणे-कोकण दरम्यान दैनंदिन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावर मध्य रेल्वेने पुण्यात ‘टर्मिनलची कमतरता’ आणि ‘मार्गाची अडचण’ (Path Constraints) असल्याचे लेखी उत्तर देऊन कोकणच्या गाडीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. मात्र, याच ‘अडचणी’ असलेल्या पुणे स्टेशनवरून ११४३१/११४३२ पुणे-दानापूर (बिहार) अमृत भारत एक्सप्रेस मंजूर करण्यात आली आहे.
देखभालीचा स्लॉटही परप्रांतीयांच्या गाडीला!
सर्वात संतापजनक बाब म्हणजे ही अमृत भारत एक्सप्रेस ‘मध्य रेल्वेच्या मालकीची’ (CR Owning) आहे. याचा अर्थ असा की, या गाडीची देखभाल (Maintenance) आणि पार्किंग पुण्यातच होणार आहे. पुण्यात आधीच जागा नसताना हा मेंटेनन्स स्लॉट बिहारच्या गाडीला दिल्यामुळे, भविष्यात कोकण किंवा महाराष्ट्रांतर्गत गाड्यांसाठी कोणतीही क्षमता शिल्लक राहणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राचा पैसा, फायदा कुणाला?
कोणत्याही नवीन रेल्वे प्रकल्पात महाराष्ट्र राज्य शासन ५०% आर्थिक वाटा उचलते. राज्यातील जनतेच्या करातून उभ्या राहिलेल्या या सुविधांचा पहिला हक्क इथल्या भूमिपुत्रांचा असायला हवा. मात्र, चित्र अगदी उलटे दिसत आहे:
-
पुणे-दानापूर (बिहार): मुख्य पुणे स्टेशनवरून ‘रेड कार्पेट’ स्वागत.नांदेड-पुणे / पुणे-हरंगुळ: महाराष्ट्रांतर्गत गाड्यांना मुख्य पुणे स्टेशनवरून थेट ‘हडपसर’ला बाहेर फेकण्यात आले.
कोकणी चाकरमान्यांमध्ये संतापाची लाट
“पुण्यात लाखो कोकणी माणूस राहतो, त्यांना सण – उत्सवाला जाण्यासाठी साधी हक्काची गाडी मिळत नाही. तांत्रिक अडचणी फक्त कोकणच्या गाड्यांनाच का येतात?” असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. स्वतःच्याच राज्यात प्रवाशांना अशी दुय्यम वागणूक मिळत असेल, तर हा अन्याय आता सहन करण्यापलीकडे गेला आहे, अशी भावना कोकण रेल्वे प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.आता या अन्यायाविरुद्ध तमाम मराठी बांधवांनी आणि लोकप्रतिनिधींनी आवाज उठवून रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्याची वेळ आली आहे.
/——–/——-/—–/
——
–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————- *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
*वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
*आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
*व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
9422054887,8275659563


